Chandrayan-3 Vikram and Pragyan : विक्रम आणि प्रज्ञानला सक्रिय करण्यासाठी इस्रोकडून उद्या केले जाणार प्रयत्न | पुढारी

Chandrayan-3 Vikram and Pragyan : विक्रम आणि प्रज्ञानला सक्रिय करण्यासाठी इस्रोकडून उद्या केले जाणार प्रयत्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्रावर पुन्हा सुर्योदय झाला असून इस्रोकडून प्रज्ञान आणि रोव्हरला सक्रिय करण्यासाठी उद्या (दि.२३) प्रयत्न केले जाणार आहेत. इस्रोकडून सध्या प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरची स्थिती काय आहे? याबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, अद्याप तेथून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क करण्यासाठी इस्रोकडून प्रयत्न सुरुच आहेत. (Chandrayan-3 Vikram and Pragyan)

आम्ही प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला २२ सप्टेंबर रोजी पुन्हा सक्रिय करण्याची योजना आखली होती. परंतु, आता काही कारणांमुळे आम्ही उद्या २३ सप्टेंबरला प्रयत्न करणार आहोत, असे इस्रोचे अहमदाबाद स्थित स्पेस सेंटरचे संचालक निलेश देसाई, म्हणाले आहेत.
इस्रोने २ आणि ४ सप्टेंबर रोजी त्यांना पूर्णपणे चार्ज करून स्लीपमोडमध्ये ठेवले होते.  कारण चंद्रावर रात्रीचा काळ सुरू झाला होता. ज्यामध्ये त्यांना भयंकर थंडी आणि रेडिएशनमधून जावे लागले होते. SAC ने ISRO साठी अंतराळ उपकरणे बनवते, त्याने चांद्रयान-3 साठी कॅमेरा प्रणाली आणि धोका सेन्सॉर प्रणाली विकसित केली. जी लँडर आणि रोव्हरवर स्थापित केली गेली. (Chandrayan-3 Vikram and Pragyan)

देसाई यांच्या मतानुसार, विक्रम आणि प्रज्ञान यांनी गेल्या २० दिवसांत उणे १२० ते उणे २०० अंश सेल्सिअसपर्यंतची थंडी सहन केली आहे. आता पृथ्वीच्या वेळेनुसार २० सप्टेंबरच्या संध्याकाळ पासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय सुरू झाला आहे. विक्रम आणि प्रग्यानचे सोलर पॅनल देखील त्यांच्या बॅटरी हळू हळू चार्ज करू लागतील. (Chandrayan-3 Vikram and Pragyan)

हेही वाचलंत का?

Back to top button