अक्षता पडताच नववधू-वर लग्नसोहळ्यातून थेट उपोषणस्थळी | पुढारी

अक्षता पडताच नववधू-वर लग्नसोहळ्यातून थेट उपोषणस्थळी

जामखेड (जि.नगर) : पुढारी वृत्तसेवा : यशवंत सेनेच्यावतीने धनगर आरक्षणसाठी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे बारा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी (दि.17) नववधू-वर लग्नसोहळ्यातून थेट उपोषणास स्थळी दाखल झाले. समाज आरक्षणाचा विषय महत्वाचा असल्याने लग्नसोहळ्यातून थेट उपोषणकर्त्यांच्या भेटीला आल्याने या नवदाम्पत्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या : 

17 ते 22 सप्टेंबर 2023 या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने श्रीक्षेत्र चौंडी येथे आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर व इतर उपोषण करत आहेत. राज्यभरातील धनगर बांधव चौंडीत दाखल होऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत आहेत. खंबाटकी घाट (ता.खंडाळा,जि.सातारा) येथे बुधवारी (दि.20) महाराष्ट्रातील धनगर समाज रास्तारोको आंदोलन करणार आहे. चौंडी येथील राज्यव्यापी आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Back to top button