नगर जिल्हा रुग्णालय होणार 500 खाटांचे!

नगर जिल्हा रुग्णालय होणार 500 खाटांचे!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्णांची वाढती संख्या पाहता 282 खाटांचे हे रुग्णालय आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात 500 खाटांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयातून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो लवकरच मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यात जिल्हा रुग्णालयातील खाटांची अपुरी संख्या, यामुळे अनेकांना खासगी दवाखान्यांत जावे लागते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन येथे 500 खाटांची व्यवस्था असावी, याकडे जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले होते. त्यावर विखे पाटील यांनी तत्काळ तसा प्रस्ताव करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार अहवाल तयार झाल्याचे समजले आहे.

89 पदे रिक्त
सध्या जिल्हा रुग्णालयात 405 पदे मंजूर आहेत. यापैकी 316 पदे कार्यरत असून, 89 पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवा देताना कर्मचार्‍यांना कसरत करावी लागते.

पालकमंत्री यांच्या सूचनांनुसार जिल्हा रुग्णालयाच्या 500 खाटांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी शासनस्तरावर पाठविला जाणार आहे.
                                           -डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर

सुमारे 300 पदांची निर्मिती होणार
जिल्हा रुग्णालयाने तयार केलेल्या 500 खाटांच्या प्रस्तावानुसार आता 594 पेक्षा अधिक पदे असणार आहेत. पूर्वीचे 405 आणि त्यात आणखी किमान 200 तर कमाल 300 पदांची निर्मिती होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. यापैकी 80 टक्केहून अधिक पदे कंत्राटी सेवेतून भरणार असल्याचीही चर्चा आहे.

नऊ डॉक्टरांवरच भिस्त
वर्ग 1 मधील वैद्यकीय अधिकार्‍यांची एकूण 18 पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात 50 टक्के जागा रिक्त असून, 9 वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय सांभाळत असल्याचेही आकडे सांगत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news