Dhangar reservation : हे सरकार निर्दयी सरकार; धनगर आरक्षणप्रश्नी सुप्रिया सुळेंची सरकारवर जहरी टीका

चोंडी ता. जामखेड येथे धनगर आरक्षणप्रश्री आंदोलकांशी चर्चा करताना खा.सुप्रिया सुळे
चोंडी ता. जामखेड येथे धनगर आरक्षणप्रश्री आंदोलकांशी चर्चा करताना खा.सुप्रिया सुळे
Published on
Updated on

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्नी चोंडीत चालु असलेल्या आंदोलनाकडे आज सहाव्या दिवशीही सरकार दुर्लक्ष करत असून, हे सरकार निर्दयी सरकार असल्याचेच यातून दिसून येत असल्याचे राष्टवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.सोमवारी रात्री साडेआठ वाजता चोंडीत धनगर आरक्षणप्रश्नी उपोषणास बसलेल्या आंदोलकांची भेट भेटली त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी खा.सुळे यांनी तब्बल एक तास आंदोलकांशी चर्चा केली. संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया आघाडीच्या वतीने धनगर आरक्षणप्रश्नी आवाज उठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. रोहित पवारही उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मुंबईत चालु असलेल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय चर्चेत घेण्याबाबत खा सुळे यांनी महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. तर आ. रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याशी फोनवर चर्चा करून, आंदोलकांची प्रकृती खालावली असल्याने, शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी.

सुळे पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून ट्विट करत त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेली सहा दिवसापासून आमरण उपोषण चालु असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा अन्य कोणतेही मंत्री आंदोलन स्थळांकडे फिरकला नसल्याबाबत खा.सुळे यांनी आश्चर्य व्यक्त करत, याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या राजपत्रात ३६ क्रमांकावर धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण असल्याचा उल्लेख आहे. हे राजपत्राची प्रत यावेळी आंदोलकांनी खा.सुळेंना दिली.

धनगर आरक्षणप्रश्री भाजपाने भूमिका स्पष्ट करावी

भाजपा सरकार राज्यात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेताना दिसत आहे. संसदेत धनगर आरक्षणाचा प्रश्र मांडला तर भाजपाचेच खासदार आरक्षण देण्यास विरोध करतात. त्यामुळे धनगर आरक्षणप्रश्री भाजपाने भूमिका स्पष्ट करावी.असेही आवाहन खा. सुळे यांनी यावेळी केले.

उपोषण मागे न घेण्यावर आंदोलक ठाम

उपोषण मागे घेण्याबाबत खा.सुळे यांनी आंदोलकांना विनंती केली. मात्र उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले, अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी जोपर्यंत धनगर आरक्षणाचा वटहूकुम निघत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाहीत आणि वैद्यकिय उपचारही घेणार नसल्याचे सांगीतले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news