आ. पाचपुते गटाला पुतण्याचा दे धक्का! संचालकांची नाराजी | पुढारी

आ. पाचपुते गटाला पुतण्याचा दे धक्का! संचालकांची नाराजी

काष्टी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कै. बाबा नजू राहिंज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शांताराम दादासाहेब राहिंज याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन संचालक मंडळातील 13 पैकी आठ संचालकांनी आक्षेप घेत, त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत. ही संस्था आमदार बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात असून, आमदार पाचपुते गटाला पुतण्या सरपंच तथा ठाकरे सेनेचे उपनेते साजन पाचपुतेंनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची तालुक्यात चर्चा आहे.

सन 2022 साली कै. बाबा नजू राहिंज सेवा सहकारी संस्थची निवडणूक झाली. यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाने पूर्ण बहुमताने सत्ता मिळविली. यानंतर एकमताने बबन उर्फ शांताराम राहिंज यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर वर्षभरात संस्थेची एकही बैठक झाली नाही, कागदोपत्री बैठक दाखवली, संचालक मंडळाला अध्यक्ष विश्वसात घेत नाही, तसेच संस्था व शेतकरी सभासदांच्या हिताचा एकही निर्णय नाही, दिवसेदिवस संस्था कर्जाच्या खाईत लोटत चालली, यामुळे संस्थेच्या दोन्ही नेतृत्वाने संस्थेकडे दुर्लक्ष केले.

यामुळे संसदेच्या संचालकांचा कोणावरही विश्वास राहिला नाही. यामुळे संस्थेत दोन गट निर्माण झाले. म्हणून यातील 13पैकी आठ संचालक लालासाहेब पंडित दांगट, विश्वनाथ दत्ता गावडे, दादा आनंदा राहिंज, धोंडीबा बापुराव राहिंज, प्रेमराज शिवराम राहिंज, कोंडीबा मारुती राहिंज, ज्ञानदेव दगडू राहिंज, अनिल विलास माने आदी संचालक साजन पाचपुते गटाला जावून मिळाल्याने त्यांनी अध्यक्ष शांताराम राहिंज यांच्या विरोधात श्रीगोंदा येथील सहायक निबंधकांकडे लेखी तक्रार देवून अध्यक्षांचे अधिकार काढून घेतले. यामध्ये आमदार पाचपुतेंना शह देण्यासाठी पुतण्या साजन पाचपुतेंनी मदत केल्याने आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे. लवकरच अध्यक्ष राहिंज यांच्यावर अविश्वास दाखल करून नवीन अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

हेही वाचा

दांडीबहाद्दरांमुळे पानशेत खोर्‍यातील शाळा बंद

धुमधडक्यात साजरा करू बैल पोळा! खरेदीसाठी आठवडे बाजारात शेतकर्‍यांची गर्दी

चंद्रपुरात मराठा समाजाच्या मागणीविरोधात रवींद्र टोंगेंचे अन्नत्याग आंदोलन

Back to top button