बोधेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ठवड्यावर येऊन ठेपलेल्या बैल पोळ्याची लगबग आता अठवडे बाजारांतून दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभारापासून पावसाचा एक थेंबही पडल्यानसल्याने आजही काही भागांत दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आपल्या लागडक्या सर्जाराजाच्या सणासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. येत्या 14 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी बैल पोळा असून, बोधेगावच्या आठवडे बाजारात शुकशुकाट दिसून आला. बैलांचे साज घेवून लांबून आलेल्या दुकानदारांनी सकाळीच आपली दुकाने थाटली होती. त्यांना ग्राहकांची आतुरता होती. परंतु, गेल्या दिड महिण्यापासून पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
खरिप हंगाम पूर्ण करपला असून, शेतकर्यांनी आपल्या जवळील सोने मोडून किंवा खासगी सावकाराकडून कर्ज घेवून नांगरट, पाळी, पेरणी, खुरपणी आणि खत जमिनीत टाकले; परंतु सगळे मातीत जाणार आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत असताना, ज्याच्या जीवावर आपले जीवण आहे, त्या जित्राबांचा सण बैल पोळा आठवड्यावर येऊन ठेपला आहे.
बैल पोळ्याच्या सणासाठी शेतकर्यांनी मोठ्या उत्साहाने खरेदी केली. बोधेगावचे ग्रामीण सचिवालय ते थेट जळगाव फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बैलांसाठी साज असलेली दुकाने होती. यात हिंग डबी, रंग, गजरे, फुगे, घागरमाळी, सर, मुथुळी, घोगर, घोगराचे पट्टे, पैजण, घंट्या, शेळी पट्टा, गाय पट्टा, म्हशीचे जोते, बेलाचे जोते, घुंगरू, शिगच्या शेंब्या मोर्हक्या, कासरा, बाशिंग शेंब्या, बैलाच्या पायात बांधण्यासाठी चवर आदींची दुकाने थाटली होती.
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील 30 ते 35 गावाचे मध्यवर्ती आठवडे बाजारचे बोधेगाव ठिकाण आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा, उमापूर, धोंडराई, खळेगाव आदी 10 ते 15 गावे, तर शिरूर तालुक्यातील पारगाव, शिरूर, येळंब अशी 8 ते 10 गावे आणि पैठण तालुक्यातील काही गावे मिळून जवळपास 60 ते 65 गावांतील शेतकरी दर गुरुवारी आठवडे बाजारासाठी बोधेगावला येतात.
हेही वाचा