आदिवासी तरुण झाला अधिकारी! कडाळेची अधिकारीपदी झेप

आदिवासी तरुण झाला अधिकारी! कडाळेची अधिकारीपदी झेप

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीतल्या डोंगराळ, आदिवासी बहुल भागातील सुनील संजय कडाळे याने तरुणाने अपार मेहनतीसह जिद्दीने अनेक अडथळे पार करीत वर्ग 2 चे कृषी मंडल अधिकारी पद मिळवून, पिंपळदरी-चास गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशाबद्दल चास ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ, भैरवनाथ विद्यालय, जि. प. शाळेने त्याचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य भागवत वाडेकर होते.

यावेळी उपसरपंच सचिन शेळके, भैरवनाथ ज्युनिअरचे प्राचार्य सुनील चौधरी, सुनील कडाळे यांचे आजोबा बजरंग कडाळे, वडील संजय कडाळे, भाऊ अजय कडाळे तसेच किशोर शिंदे, संपत पवार, गणेश शेळके, निवृत्ती पवार, शिक्षक विजय दुरगुडे, भास्कर तुरनर, रोटरीचे अध्यक्ष प्रा. अमोल वैद्य, प्रा. संदीप नवले, प्रा. शिवाजी खुळे, प्रा. मनिष शेटे, रोहिदास शेळके, भारत शेळके, आर. के. दुरगुडे, सुदर्शन आळणे, रामनाथ शेळके, पंढरीनाथ मेंगाळ आदी ग्रामस्थांसह शिक्षक उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच शेळके म्हणाले, गरीब कुटुंबातील मुलगा स्पर्धा परीक्षेतून मोठ्या पदावर जाऊ शकतो, ही गावास अभिमानाची गोष्ट आहे. तरुणांनी हे यश लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी शाळेपासून करावी, असे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक शिक्षक भारत शेळके यांनी तर सूत्रसंचालन शिवराम भोर यांनी केले.

मुलांनो, 7- 12 चा अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच स्पर्धा परीक्षा पास होणार. अभ्यासाचे 7- 12 चे सूत्र म्हणजे सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत कसून अभ्यास करणे. माझ्या यशात आजोबा बजरंग कडाळे यांच्यासह आई, वडील, पिंपळदरीच्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

– सुनील कडाळे, सत्कारमूर्ती कृषी मंडळ अधिकारी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news