Ngar Crime : सरपंच, उपसरपंचाच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; जामखेड तालुक्यात एकच खळबळ

Ngar Crime : सरपंच, उपसरपंचाच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; जामखेड तालुक्यात एकच खळबळ
Published on
Updated on

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून ग्रामपंचायत मध्ये झालेल्या वादाच्या कारणांवरून शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर सोडणार नाही असे म्हणत गंचाडी पकडून सरपंच व उपसरपंच यांनी मारहाण केली. यामुळे मेंदू मध्ये रक्तस्राव झाला व उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी फिर्याद खर्डा पोलीसात दाखल करण्यात आली आहे.  यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

फिर्यादी रेखा रावसाहेब रावण वय ५२ रा. घोडेगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा गणेश रावसाहेब रावण वय ३२ हा ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. तो व शरद जगताप एकाच प्रभागातून निवडून आले होते. यानंतर सरपंच पदासाठी गणेशने शरद जगताप यास मतदान केले होते. व वर्षानंतर गणेशला सरपंच करायचे ठरले होते. पण एक वर्ष झाले तरी सरपंच शरद जगताप याने राजीनामा दिला नाही. यामुळे मयत गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत भांडणे होत होते.

दि. ३० जून २०२३ रोजी गणेश हा सकाळी १० वाजता ग्रामपंचायत मध्ये मिटींग साठी गेला नंतर दुपारी तो घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर झोपलेला दिसला त्यांने जेवनही केले नव्हते याचे कारण विचारले तर त्यांने डोके दुखत आहे असे सांगितले डोके दुखण्याचे कारण विचारले तर त्यांने सांगितले की, ग्रामपंचायत मध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंच शमशाद शौकत मुलानी ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते.

यावेळी मागील खर्चाचा हिशोब मागितल्यावरून सरपंच व माझी वादावादी झाली. मी घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून तु हिशोब मागतो काय म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही म्हणून शौकत मुलानी यांने गंचाडी पकडून हाताने कानाखाली मारहाण केली. यावेळी शरद जगताप याने हाताने पाठीमागून डोक्यावर मारहाण केली. यावेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे.

यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गणेश ची उलटी झाली यानंतर गणेश यास जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले नंतर सीटीस्कँन करण्यात आला याचा रिपोर्ट आल्यावर नगरला हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले यानुसार नगरला दाखल केले याच उपचारादरम्यान दि. २ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.४८ वाजता गणेश मयत झाला. अशी फिर्याद मयत गणेशची आई रेखा रावसाहेब रावण वय ५२ रा. घोडेगाव यांनी खर्डा पोलीसात २५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news