बाप रे ! चक्क 50 कोटींची थकबाकी ; महावितरणवर आर्थिक ताण

बाप रे ! चक्क 50 कोटींची थकबाकी ; महावितरणवर आर्थिक ताण
Published on
Updated on

पिंपरी : महावितरणची शहरातील नागरिकांची चक्क 50 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे महावितरणचे आर्थिक दिवाळे निघणार आहे. याची चाहूल लागताच कार्यालयाच्या वतीने कारवाईचे शस्त्र उगारण्यात आले आहे. गेल्या पंचवीस दिवसांत 2 हजार 812 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नागरिकांनी थकित बिलाची रक्कम भरून, महावितरणला मदत करण्याचे आवाहन कार्यालयाच्या वतीने वारंवार करण्यात आले आहे. मात्र बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने शहरातील घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 50 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक क्षेत्रातील एकूण 1 लाख 36 हजार 681 ग्राहकांकडून 50 कोटी 49 लाख रुपयांचे बिल येणे बाकी आहे. एवढ्या मोठ्या बिलाची रक्कम वसूल करण्याचे काम महावितरणकडून सुरू झाले आहे.

नागरिकांना शॉक
ज्या ग्राहकांची एक महिन्याची वीजबिलाची थकबाकी आहे. त्यांचा देखील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम शहरात सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या या कृतीमुळे नागरिकांना शॉक बसला आहे.

महावितरणचे स्वतंत्र तपासणी पथक
ज्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. असे काही ग्राहक शेजारील नागरिकांच्या घरामध्ये वायर टाकून आपली गरज पूर्ण करत आहेत. अशाप्रकारे विजेची चोरी करणार्‍या ग्राहकांवर कारवाईसाठी स्वतंत्र तपासणी पथक नेमण्यात आले आहे.

कायद्याचा होणार वापर…
जे ग्राहक शेजारी किंवा परिसरातील खांबावरून वायर अथवा केबलद्वारे बेकायदा विजेचा वापर करत आहेत. अशा ग्राहकांवर स्वतंत्र पथकाद्वारे भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ग्राहकांकडून वसुली ही महावितरणची प्राथमिकता आहे. ग्राहकांकडून आलेल्या बिलाच्या रकमेमधून महावितरणची कार्यप्रणाली सुरू असते; मात्र हिच थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याने महावितरणवर आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे.
                                   – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.

ऑनलाईनद्वारे भरा वीजबिल
www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे ग्राहकांना वीज भरणा करता येऊ शकतो. तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारेदेखील थकबाकीची रक्कम भरता येऊ शकते. नागरिकांनी ऑनलाईनद्वारे बिल भरण्याचे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.

एनईएफटी, आरटीजीएस सुविधा
ज्या ग्राहकांची थकबाकीची रक्कम पाच हजार किंवा त्याहून अधिक आहे. त्या ग्राहकांसाठी महावितरणच्या वतीने एनईएफटी आणि आरटीजीएसची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक तपशील वीजबिलावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news