राशीनच्या सुपुत्राची राज्यातून निवड

राशीनच्या सुपुत्राची राज्यातून निवड
Published on
Updated on

राशीन(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील तळा येथे शिक्षक असलेले राशीनचे सुपुत्र विठ्ठल जगदीश रेणूकर यांची सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी), नवी दिल्लीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण 2020 साठी उदयपूर (राजस्थान) येथे होणार्‍या शिक्षक प्रशिक्षणासाठी राज्यातून निवड झाली आहे. 5 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार्‍या प्रशिक्षणासाठी राज्यातून दहा शिक्षकांची निवड झाली. त्यात रेणूकर यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने तब्बल चौतीस वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्थिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नव्या आर्थिक धोरणामध्ये मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच, शिक्षण मंत्रालयाने बहुचर्चित अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट हा उपक्रम आणला आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण महत्त्वाचे समजले जाते.

रेणूकर यांनी कोरोना काळात राज्यातील 500 शिक्षकांसाठी 'ऑनलाईन डिजिटल लिटरसी'चे कार्यक्रम, दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संगणकीय कौशल्यांचे प्रशिक्षण, 'अविरत' या शासनाच्या उपक्रमाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी व नोकरदार यांचे आर्थिक नियोजन व त्यांच्या गुंतवणुकीवर ते पी.एचडी.चे संशोधन करीत आहेत. त्यांनी ऑनलाईन कलमापन चाचणीसाठी मुंबई विभाग स्तरावर समन्वयक म्हणून काम केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जिल्ह्याचे कॅप असेसमेंट सेंटरचे संचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या अनुषंगाने भारतीय उद्योजकता विकास व टाटा कम्युनिकेशन लिमिटेड मुंबई मार्फत आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेतले आहेत. नवोपक्रम स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते जगदीश रेणुकर यांचे ते चिरंजीव आहेत. रेणुकर यांच्या निवडीबद्दल राशीन गुरव समाज संघटनेच्या वतीने त्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news