पुणे : आंदोलनाचा एसटीला 21 लाखांचा फटका | पुढारी

पुणे : आंदोलनाचा एसटीला 21 लाखांचा फटका

पुणे : मराठवाडा, विदर्भात पेटलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या सलग तिसर्‍या दिवशी 489 फेर्‍या रद्द झाल्या. त्यामुळे सोमवारी एसटीच्या पुणे विभाग प्रशासनाला 21 लाख 32 हजार 492 रूपयांचे नुकसान झाले. आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. रविवारी एसटीच्या 700 फेर्‍या रद्द झाल्या होत्या. पुणे स्टेशन स्टँडवरून होणारी एसटीची वाहतूक आणि स्वारगेट एसटी स्थानकावरून होणारी एसटीची वाहतूक सुरळीत सुरू
होती. असे एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.

एसटीची पुण्यातील स्थिती

  • सुटणार्‍या नियोजित फेर्‍यांची संख्या : 1346
  • आंदोलनामुळे रद्द झालेल्या फेर्‍यांची संख्या : 489
  • रद्द झालेले किलोमीटर : 52,511
  • रद्द फेर्‍यांमुळे झालेले आर्थिक नुकसान : 21,32,492
  • जळालेल्या बस : 00
  • तोडफोड झालेल्या बस : 00

हेही वाचा

माझ्या मनात कुणाविषयी कटुता नाही : पंकजा मुंडे

Jalana Maratha Andoln : मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी

जपानमध्ये चक्क हसणे शिकवणारा अनोखा क्लास!

Back to top button