जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ अकोल्यात शंभर टक्के बंद | पुढारी

जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ अकोल्यात शंभर टक्के बंद

अकोले पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळत मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ अकोले शंभर टक्के बंद ठेवून सर्व पक्षीय जाती धर्मातील नागरिकाकडुन निषेध व्यक्त करण्यात आला तर आ.डॉ, किरण लहामटे यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला. ज्या घटनेत लहान मुले महिलांना सुद्धा पोलिसांनी मारहाण केली अशी निर्दयी घटना काल जालन्यात घडली. आज वेळ मराठा समाजावर आहे उद्या दुस-यावर असेल त्यामुळे
सत्ताधारी पक्षाचेही कार्यकर्ते कालच्या चुकीच्या घटनेचा निषेधासाठी पुढे आले आहे.

काल महाराष्ट्रात काय घडत होते. महाराष्ट्रात देशातील आघाडीचे नेतेची इंडिया आघाडी बैठक काल मुंबईत सुरु होती. दिल्लीचे सरकारचे लोकशाहीचे मार्गाने हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.एक देश एक निवडणूक हा निर्णय घेण्याचा प्रयोग सुरु आहे व याची दिल्लीतील चर्चा थांबवायची होती व ६० टक्के जनतेचा पाठिंबा असलेली इंडिया आघाडीचे विचार महाराष्ट्रातील तळागाळातल्या माणसांपर्यत पोहचू द्यायचे नव्हते म्हणून चर्चा वळवण्यासाठी मराठा समाजावर काल आसूड ओढला गेला.

लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा करावा लागणार आहे असे मत काँ.डॉ. अजित नवले यांनी यावेळी व्यक्त केले. अकोले तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी आ.डॉ. किरण लहामटे,डॉ. अजित नवले,शिवाजीराजे धुमाळ, भानुदास तिंकाडे, सचिन शेटे,चंद्रकांत सरोदे, संदिप शेणकर,शाहिदभाई फारुकी,संपतराव नाईकवाडी,मिनानाथ पांडे, स्वप्निल धांडे,दत्ता नवले,अँड वसंत मनकर,डॉ. संदिप कडलग,सोमनाथ नवले,परबत नाईकवाडी, मिनानाथ पांडे,विनय सांवत, गणेश कानवडे,दादा पाटील वाकचौरे,शांताराम संगारे, मोसिन शेख,नवनाथ शेटे उपस्थित होते. अकोले तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे यांना निवेदन देण्यात आले.

जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलन सुरू असताना लाठी चार्ज करण्याची घटना लाजिरवाणी आहे.आंदोलन स्थळी दोन दिवसा पासून आंदोलक बसले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलच्या भावना तीव्र आहे. तर हे आंदोलन बऱ्याच वर्षापासून चालू आहे. सरकार आरक्षणाची लढाई लढते.परंतु आपल्याला आरक्षण भेटते की नाही यामुळे जनतेत असमाधान आहे. म्हणून जनता सर्व एकत्र येऊन हे आंदोलन करत होती. आंदोलनात मोठा जनसमुदाय होता परंतु थोडाफार इकडे तिकडे होणार पण मात्र एवढा मोठा लाठीचार्ज पोलिसांनी करणे हा पर्याय नव्हता.तर या लाठीचार्जची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यावर कधीही लाटीचार्ज झाला नाही पाहिजे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षण आदोलनात लाठीचार्जचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.   

                                                                              -आ.डॉ. किरण लहामटे 

हेही वाचा :

अहमदनगर : बांधकामासाठी अट शिथिल करावी; शिवसेनेचे संरक्षणमंत्र्यांना निवेदन

Accident : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर अपघात; दोन जण ठार

Back to top button