Accident : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर अपघात; दोन जण ठार | पुढारी

Accident : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर अपघात; दोन जण ठार

सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर-संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव येथील मार्केट यार्डसमोर शुक्रवारी (दि. 1) पहाटे पाच वाजता ट्रकव कंटेनरची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. आदिनाथ भीमराव वने (रा. पाटण, ता. आष्टी, जि. बीड) व मिराहुसेन खुदबद्दिन मुजावर (रा. जत, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत संजय लक्ष्मण घुले (वय 34, चालक, रा. शेकटे, ता. पाथर्डी) यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे,
संभाजीनगरकडून कंटेनर (एमएच 43 वाय 5011) घेऊन चालक आदिनाथ वने नगरकडे जात होता. भरधाव असलेला हा कंटेनर दुभाजक ओलांडून समोरून येणार्‍या ट्रकवर (एमएच 14 केक्यू 1599) धडकला. या अपघातात वने यांच्यासह ट्रकचालक मुजावर यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अडकित्ते तपास करीत आहेत.

हेही वाचा

जालना: अंबड चौफुली येथे वाहनांवर दगडफेक

बेळगावातील तरुणाचा खून; कोल्‍हापुरातील दोन तरूणांना अटक

अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड : फरारी महिला पुण्यातून अटकेत

Back to top button