पारनेर-नगरमध्ये चारा डेपो, पाण्याचे टँकर सुरू करा : आ. नीलेश लंके | पुढारी

पारनेर-नगरमध्ये चारा डेपो, पाण्याचे टँकर सुरू करा : आ. नीलेश लंके

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाने दडी मारल्याने पारनेर-नगर मतदारसंघात जनावरांचा चारा, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने तत्काळ चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्याबरोबरच पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या वाढवा, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पाऊस नसल्याने पारनेर-नगर मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती आहे.

पाण्याचे स्रोेत आटल्याने विविध गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच पशुधनासाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी वाढत आहे. पशुधनासाठी चारा नसल्याने पशुधन जगवायचे कसे याचा प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकार्‍यांना तसे आदेश देण्याची विनंती आमदार लंके यांनी केली.

‘मांडओहळ’ने गाठला तळ

तालुक्यात टँकरद्वारे मांडओहळ प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्या प्रकल्पानेही तळ गाठला असून, पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी नवा स्रोेत शोधावा लागणार आहे.

हेही वाचा

Seema Haider : सीमा हैदरला बुलावा बिग बॉसचा? १७ व्या सीझनमध्ये दिसणार?

रुईछत्तिशी : 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना अधांतरीच?

कोळपेवाडी : आगाऊ पिक विम्याचा अध्यादेश काढण्यास विलंब नको : आ. काळे

Back to top button