अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : बहीण भावाच्या अतूट नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन! बहिणीने पाठवलेली राखी भावाच्या हाती वेळेवर मिळावी, याकरिता डाक विभागाच्या वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम राबवलेली होती. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. अशा वेळी पोस्टाने राखी पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. या सर्वच राख्या सुरक्षितपणे वेळेत पोहोचविण्यासाठी डाक विभाग नेहमीच प्राधान्य देत असते. आजच्या रक्षाबंधनाच्या विशेष दिनी अहमदनगर विभागातील सर्वच डाकघराकडून आलेल्या सर्व राख्या आपल्या भाऊरायाकडे पोहोच केल्या.
आजच्या दिवशी केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने आलेल्या सर्व राख्या पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणीने पाठवलेली राखी भाऊरायाच्या हाती मिळताच त्याच्या चेहर्यावरील आनंद निश्चितच समाधान देणारा होता.
आजच्या राखी वाटपाच्या विशेष मोहिमेत केडगाव पोस्ट ऑफिसमधून पन्नासपेक्षा अधिक राख्या भाऊरायांच्या हाती सोपविण्यात आल्या.
पोस्टऑफिसमध्ये संतोष यादव, शुभांगी मांडगे, प्रियांका भोपळे, अजय परमार यांच्या नियोजनात सोमनाथ घोडके, शिवाजी कांबळे, अंबादास सुद्रीक, दीपक भुसारे, संजीव पवार या पोस्टमन बांधवाच्या सहकार्यामुळे आजच्या शुभदिनी राख्या भाऊरायांच्या हाती सोपविण्याची विशेष मोहीम यशस्वी करण्यात आली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणीने, भाऊरायाला पाठवलेली राखी मिळताच भाऊरायाच्या चेहर्यावरील समाधान हे निश्चितच आनंद देणारे असते.
– संतोष यादव, पोस्टमास्तर, केडगाव
हेही वाचा