‘त्यांचे’ पाय शहामृगासारखे! | पुढारी

‘त्यांचे’ पाय शहामृगासारखे!

कान्येम्बा : हे जग छोटे अजिबात नाही, याची पावलोपावली प्रचिती येत असते. कारण एका टोकावर जे दिसते, ते दुसर्‍या टोकावर अजिबात असत नाही. अशा सर्व ठिकाणी वागणे-बोलणे विभिन्न, खाणे-पिणे विभिन्न अन् संस्कृतीही विभिन्न. जगभरात एकापेक्षा एक समुदायही विभिन्न. या प्रत्येक समुदायाची रीतभात पूर्णपणे वेगळी; पण याच पटलावर एक समुदाय असाही आहे, ज्याचे केवळ वर्णनच थक्क करणारे आहे. या समुदायात चेहरा माणसासारखा असतो. दिसणे माणसासारखे असते; पण त्यांचे पाय मात्र चक्क शहामृगासारखे असतात. सामान्यांप्रमाणे यांच्या पायाला 5 बोटे असत नाहीत तर चक्क दोनच बोटे असतात!

डेली स्टारने दिलेल्या रिपोर्टनुसार, डोमा समुदायाच्या लोकांत अशी विसंगती आढळून येते. या लोकांना वाडोमा असेही ओळखले जाते. झिम्बाब्वेतील कान्येम्बा क्षेत्रात हा समुदाय वसलेला आहे. या पूर्ण समुदायात अनुवंशिक विकार आहे, ज्याला इक्ट्रोडॅक्टिली, असे म्हटले जाते. याच कारणामुळे या लोकांच्या पायाची बोटे 5 ऐवजी केवळ दोनच असतात.

लॉबस्टर क्लॉ सिंड्रोम असे या अनुवंशिक उत्परिवर्तनाला ओळखले जाते. ड्रोमा समुदायात प्रत्येक चौथ्या मुलाला या समस्येला सामोरे जावे लागते, असे आकडेवारीवरून दिसून येते. अन्य समुदायातील लोकांशी विवाहाची परवानगी या लोकांना असत नाही. आता पायाची दोनच बोटे असल्याने हे लोक व्यवस्थित पादत्राणे घालू शकत नाहीत आणि नीट चालूही शकत नाहीत. झाडावर चढण्याबाबत मात्र या लोकांचा कोणीच हात धरू शकत नाही.

Back to top button