अहमदनगर : सराफा दुकानात चोरी करणारा ताब्यात | पुढारी

अहमदनगर : सराफा दुकानात चोरी करणारा ताब्यात

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यानंतर ते फेडण्यासाठी एका तरुणाने चक्क सराफा दुकान गाठले अन् दागिन्यांची चोरी केली. टिळक रस्त्यावरील शिंगवी ज्वेलर्समध्ये दागिने चोरी करणार्‍या तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून 25 ग्रम वजनाचे दीड लाखाचे दागिने हस्तगत केले. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सराफा दुकानात चोरी झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरवत या चोराला ताब्यात घेतले.

कामरान सिराज शेख (वय 36, रा. माळीवाडा, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. टिळक रोडवरील शिंगवी ज्वेलर्स येथे आरोपी कामरान शेख हा दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. दागिने पाहत असतानाच सुमारे 25 ग्रॅम वजनाचे दागिने हातचलाखीने चोरी केले होते. दागिने चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाल नितीन शिंगवी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरी करणारा आरोपी कामरान शेख हा माळीवाड्यातील त्याच्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक यादव यांनी आरोपीला अटक करण्यासाठी गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या होत्या. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता शेख याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमात जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक सचिन गायकवाड करीत आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, सचिन गायकवाड, रियाज इनामदार, अमोल गाढे, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

कर्जत नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का ?

सत्ताधारी आमदार गोंधळलेले

पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा होतोय घट्ट

Back to top button