

बोधेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बोधेगाव ग्रामपंचातीमध्ये 14, 15 वा वित्त आयोग, राष्ट्रीय रूरर्बन, दलित वस्ती सुधार योजनांमधील विविध विकासकामे व न केलेल्या कामांचे बिल काढण्याची, तसेच सेवा सोसायटीमधील व्यापारी संकुलाचे काम, रेशन दुकानातील गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी राष्ट्रवादीचे कुंडलिक घोरतळे, माजी सरपंच रामजी अंधारे यांनी काल बोधेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी विस्तार अधिकारी एम. व्ही. भोसले, बोधेगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक सचिन भाकरे उपस्थित होते. सोसायटीमधील व्यापारी संकुल व रेशन दुकानातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी श्रीरामपूर येथील लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अहवालात दोषी आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन शेवगावचे सहायक निबंधक आर. एम. दारकुंडे यांनी दिले. त्यामुळे आठ दिवसांकरिता रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी सांगितले.
यावेळी पोलिस भाऊराव भोंगळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल घोरतळे, उपाध्यक्ष प्रसाद पवार, ज्ञानदेव घोरतळे, सोपान घोरतळे, नवनाथ घोरतळे, संजय बनसोडे, संजय भोंगळे, नवनाथ खोले, संतोष वाबळे, शनेश्वर शेटे, संजय घोरतळे, आसाराम वाघमारे, आकाश दसपुते, विश्वनाथ कुढेकर, गंगाधर घोरतळे आदी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक भास्कर गावंडे यांनी चोख बंदोवस्त ठेवला होता.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांनी काल सकाळी 9 वाजता बोधेगावच्या बन्नोमाँ दर्ग्यासमोर येत गटविकास आधिकारी राजेश कदम यांनी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकार्यांंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
हेही वाचा