संगमनेर : ऑक्सिजन प्लँटमधील तांब्याचे पाईप चोरून नेले | पुढारी

संगमनेर : ऑक्सिजन प्लँटमधील तांब्याचे पाईप चोरून नेले

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाल्याने राज्य सरकारने ग्रामीण रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी ऑक्सिजनसाठी प्लांटची निर्मिती केली. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करण्यात आला होता. या प्लांटमधून चोरट्यांनी 12 लाख 61 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील घुलेवाडी येथे ग्रामीण रुग्णालय असून या ठिकाणी शासनाने ऑक्सिजन प्लांट उभारला होता. गेल्या काही दिवसांपासून हा प्लांट बंदच असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ग्रामीण रुग्णालयाकडून या प्लांट सुरक्षा केली जात नसल्याचे नाही. याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला असून सोमवारी अज्ञात चोरट्यांनी घुलेवाडी ऑक्सिजन प्लांट मधून तांब्याचे पाईप आणि ऑक्सिजनचे आउटलेट टर्मिनल चोरून नेले आहेत. त्याची किंमत 12 लाख 61 हजार 29 रुपये असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसात शकुंतला आसाराम पालवे, परिसेविका ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर, घुलेवाडी, संगमनेर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी ट्रामा केअर सेंटर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून आत मध्ये प्रवेश करून सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईप लाईन व टर्मिनल तोडून त्यातील तांब्याचे पाईप चोरी करून घेऊन गेले आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कार्यालयांमध्येच चोरी झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला असून गजबजलेल्या रूग्णालयात चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा

नाशिक : पॅनकार्ड अपडेटचा बहाणा, मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे चार लाखांना गंडा

लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले

कॅलिफोर्नियामध्ये माथेफिरुचा अंदाधूंद गोळीबार; ५ ठार, ६ गंभीर

Back to top button