कॅलिफोर्नियामध्ये माथेफिरुचा अंदाधूंद गोळीबार; ५ ठार, ६ गंभीर | पुढारी

कॅलिफोर्नियामध्ये माथेफिरुचा अंदाधूंद गोळीबार; ५ ठार, ६ गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील एका बारमध्‍ये माथेफिरुने केलेल्‍या अंदाधूंद गोळीबारात ५ जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त ‘डेली मेल;ने दिले आहे. ( Mass shooting at California )

निवृत्त कायदा अंमलबाजवणी अधिकारी आपल्‍या कुटुंबासह बारमध्‍ये आला होता. यावेळी त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांशी वाद झाला. त्‍याने अंदाधूंद गोळीबार केला. यामध्‍ये चार जण जागीच झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले. यावेळी सुरक्षा कर्मचार्‍यांनी केलेल्‍या गोळीबार हल्‍लेखोर ठार झाला. गोळीबारात जखमी झालेल्या सहा जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Back to top button