नगर : बिबट्याकडून घोड्याची शिकार !

नगर : बिबट्याकडून घोड्याची शिकार !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील खोसपुरी येथे मंगळवारी (दि.22) पहाटे बिबट्याकडून घोड्याची शिकार करण्यात आली. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. खोसपुरी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. खोसपुरी शिवारातील शेवगाव रस्त्याला म्हतारदेव त्रिपती देवकर यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारील जागेत घोडा बांधलेला होता. यावेळी बिबट्याने हल्ला करून घोड्याची शिकार केली. परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचे या क्षेत्रात वास्तव्य असल्याचे दिसून येते.

उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कृष्णा हिरे, वनरक्षक मनेष जाधव, वन कर्मचारी संजय सरोदे यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी घोड्याचे शवविच्छेदन केले. परिसरात वन विभागाच्या अधिकार्‍यांना बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.

घोड्याची शिकार केली तो भाग सपाट असून, लोकवस्तीत आहे.
डोंगर नसलेल्या भागात बिबट्याने घोड्याची शिकार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी सरपंच अविनाश आव्हाड, पोलिस पाटील अंबादास देवकर, भारत हारेर, भारत देवकर, बाळासाहेब देवकर यांनी भेट दिली.

खोसपुरी परिसरात बिबट्याचे ठसे
आढळून आलेले आहेत. नागरिकांनी, शेतकर्‍यांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. बिबट्याची छेड न काढता दिसल्यास तत्काळ वन विभागाची संपर्क साधावा.
                                    – सुरेश राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग

खोसपुरी परिसरात बिबट्याचा वावर
आढळून आला असून, ग्रामस्थांनी आपली व लहान मुलांची काळजी घ्यावी. वन विभागातर्फे खोसपुरीत पिंजरा लावण्यात यावा.
                                               -अविनाश आव्हाड, सरपंच, खोसपुरी 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news