भाड्याने ग्रामसेवक पाहिजे.! सोशल मिडियावर जाहिरात होते आहे व्हायरल

भाड्याने ग्रामसेवक पाहिजे.! सोशल मिडियावर जाहिरात होते आहे व्हायरल

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  घर भाड्याने पाहिजे, कामासाठी मुले पाहिजेत, गाळा भाड्याने देणे आहे, जमीन विकणे आहे… अशा अनेक जाहिराती वर्तमानपत्रांत, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या जात असतात. मात्र नगर तालुक्यातील एका युवकाने चक्क 'भाड्याने ग्रामसेवक पाहिजे' अशी जाहिरात सोशल मीडियावर टाकली असून ती व्हायरल झाली आहे. नगर तालुक्यातील एका गावातील युवक सोशल मीडियावर विविध रील टाकत असतो. त्याला फॉलोअर्सही बरेच आहेत.

या युवकाने टाकलेली 'ग्रामसेवक भाड्याने पाहिजे' ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे. त्याच्या गावाला गेल्या अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमलेला नाही. या कालावधीत ज्यांच्या नेमणुका झाल्या, त्यांच्याकडे दोन-दोन गावांचा कार्यभार असल्याने ग्रामस्थांना ग्रामसेवक कधीच ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध होत नाही. अडीच वर्षांत तीन-चार ग्रामसेवक बदलले. सध्या जे ग्रामसेवक आहेत, त्यांनी आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस गावासाठी ठेवले आहेत. मंगळवारी (दि.22) ग्रामसेवक भेटतील म्हणून संबंधित तरुणासह अनेक ग्रामस्थ सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयात विविध कामे घेऊन गेले होते. पण दुपार टळून गेली तरी ग्रामसेवक न आल्याने या सर्वांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या या युवकाने थेट सोशल मीडियावरच आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

या पोस्टमध्ये लिहिले आहे…
भाड्याने ग्रामसेवक पाहिजे. कोणी असेल तर कळवा… गेली अडीच वर्षे झाली, ग्रामपंचायतील कायमचा ग्रामसेवक मिळालेला नाही.. (या मजकुरासोबत ग्रामपंचायत कार्यालयाचा फोटोही आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news