जामखेड : जमिनीच्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

जामखेड : जमिनीच्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड  (नगर ): पुढारी वृत्तसेवा : तीन एकर शेतीच्या वादातून, तसेच जनावरे बांधल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील सांगवी येथे लोखंडी गज व कुर्‍हाडीने केलेल्या मारहाणीत पाच जण जखमी झाले. या प्रकरणी सात जणांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत डिगांबर महारनवर, संजय डिगांबर महारनवर, वैभव भागवत महारनवर, योगेश संजय महारनवर, राम कुवर भागवत महारनवर, उर्मिला संजय महारनवर व सुशिला डिगांबर महारनवर (सर्व रा. सांगवी ता. जामखेड, जि.नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महादेव जालिंदर महारनवर यांनी फिर्याद दिली आहे.

जामखेड तालुक्यातील सांगवी येथे महादेव महारनवर यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत 20 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता आरोपींनी शेतीच्या वादातून, तसेच जागेत जनावरे बांधल्याचे कारणावरून महादेव महारनवर, जालिंदर महारनवर, इंदूबाई महारनवर, अलका महारनवर, विशाल महारनवर यांना लोखंडी गज, काठी, कुर्‍हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा :

चिचोंडी पाटील : शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव

नगर : पिंपळगाव तलावातून अवैध पाणी उपसा !

Back to top button