नगर : पिंपळगाव तलावातून अवैध पाणी उपसा !

नगर : पिंपळगाव तलावातून अवैध पाणी उपसा !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातून बेसुमार अवैध पाणीउपसा सुरू आहे. हा पाणी उपसा तात्काळ बंद करावा, या मागणीसाठी सोमवारी (दि.28) उपोषण करण्याचा इशारा शिवप्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरख आढाव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पिंपळगाव माळवी तलावात सद्यस्थितीत फक्त 30 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

तलावातून परिसरातील जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण यासारख्या पाच ते सहा गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाणीसाठा शिल्लक राहणे गरजेचे आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तलावात आदिवासी समाजाच्या वतीने मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. तसेच, परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने अवैध पाणी उपसा बंद करणे गरजेचे आहे. तलावातील रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अवैध पाणी उपसा बंद न केल्यास शिवप्रहार संघटनेच्या वतीने दि.28 रोजी महापालिका कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर गोरख आढाव, राहुल शिंदे, योगेश शिंदे, मनोज भोंदे, अभिमन्यू झिने, राजू रासकर, रामदास झिने, गणेश कदम, आदिनाथ झिने, सुशांत शिंदे, हरीष गायकवाड, एकनाथ झिने, सोमनाथ झिने, सागर गुंड यांच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news