अहमदनगर : गुटख्याचा लाखोंचा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची राहाता-साकुरी रस्त्यावर कारवाई | पुढारी

अहमदनगर : गुटख्याचा लाखोंचा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची राहाता-साकुरी रस्त्यावर कारवाई

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राहाता ते राकुरी रस्त्यावर गुटख्याची वाहतूक होत असताना, एलसीबीच्या पथकाने सापळा लावून पाच जणांना लाखोंच्या गुटखा व वाहनांसह ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या टिमने सापळा लावून गुटख्याचा मोठा साठा जप्त केला असून, गुटख्यासह तीन कार, एक मालवाहू टेम्पो, मोबाईल, असा 38 लाख 73 हजार 666 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कलिम रहिम शहा (वय 32, रा. नांदुर्खी, ता. राहाता), अलीम रहिम शहा (वय 29, रा.श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता), अरबाज अजीज शेख (वय 23, रा. नांदुर्खी, ता. राहाता), राजू हबीब शेख (वय 35, रा.श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता), अल्ताफ अब्दुल बागवान (वय 36, रा. दत्तनगर, ता. कोपरगाव) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

राहाता रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ पॅगो रिक्षातून कारमध्ये गोण्या भरताना काही जण आढळून आले. पोलिसांनी शिताफीने आरोपींनी ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला गुटखा अभय गुप्ता (रा. इंदौर, मध्यप्रदेश), प्रमोद बोथरा (रा.कोपरगाव) यांच्याकडून आणल्याची कबुली आरोपींनी दिली. पुढील तपास राहाता पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

रायगड : चार वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला शिताफिने अटक

काळम्मावाडी धरणाची गळती यंदा तरी रोखणार का?

बहार विशेष : कायदे बदलांचे दूरगामी परिणाम

Back to top button