संगमनेर : सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार | पुढारी

संगमनेर : सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावाच्या परिसरातील एका गावात लग्न जुळविण्याच्या हेतूने मुलीस पाहण्यासाठी आलेला मुलाने तिच्याच नातेसंबंधातील आदिवासी समाजातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस मोबाइलद्वारे संपर्क साधून जवळीकता वाढविली. यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने बिंग फुटले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावच्या परिसरातील गावात पीडितेच्या मामाच्या मुलीला पाहण्यासाठी मुलगा आला. पाहण्यासाठी आलेल्या मुलाला होकार नकार कळविण्यासाठी संपर्क क्रमांक पाहिजे होता. यात मुलीकडे मोबाईल नव्हता म्हणून संबंधित मुलास नातेसंबंधातील अल्पवयीन मुलीचा मोबाईल क्रमांक दिला. यानंतर आरोपीने या पिडीत मुलीला वारंवार मेसेज, संपर्क करीत लग्नाची साद घातली.

संबंधित अल्पवयीन मुलीस भुरळ पाडत तिला आपलस करत वारंवार अत्याचार करण्यात आले. यानंतर संबंधित पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने या प्रकाराचे बिंग फुटले.यानंतर पीडित मुलीने संबंधित मुलाशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. परंतु यास नकार देत, जिवे मारण्याची धमकी देऊ लागल्याने पीडित मुलीने आई _वडिलांना सबंधित हकीकत सांगितली.

आई- वडिलांनी मुलीवर झालेल्या अत्याचााविरोधात घारगाव पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांपुढे कथन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत आरोपी प्रवीण सावळेराम जाधव (रा. आंबेगव्हाण ता. जुन्नर, जिल्हा पुणे) यास अटक केली आहे.

हेही वाचा

परभणी: इसादच्या सरपंच सविता सातपुते यांचा राजीनामा; अनिल सातपुते यांची वर्णी लागणार

भेंडा : आरोग्य मंदिराच्या पावित्र्याची जबाबदारी कोणाची?

शेवगाव : श्री रेणुकामाता मंदिरातील मुर्तीचा लाखो रुपयांचा साज चोरीला

Back to top button