शेवगाव : श्री रेणुकामाता मंदिरातील मुर्तीचा लाखो रुपयांचा साज चोरीला | पुढारी

शेवगाव : श्री रेणुकामाता मंदिरातील मुर्तीचा लाखो रुपयांचा साज चोरीला

रमेश चौधरी

शेवगाव तालुका(अहमदनगर) : तालुक्यातील अमरापूर येथील श्री रेणुकामाता मंदिरातील मुर्तीचा लाखो रुपयांचा सोने चांदीचा साज चोरीला गेल्याची घटना घडली असुन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अमरापुर येथे नगर राज्यमार्गालगत असणाऱ्या श्री क्षेत्र रेणुकामाता मंदिराच्या गाभार्‍यातुन मुर्तीला साज असलेल्या सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पर्यविक्षाधीन सहा. पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक दिलीप आहेर यांच्यासह पोलिस पथक आणि ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरांची चित्रफित तपासली असता यात दोन चोरटे कैद झाल्याचे दिसुन आले.

मंदिराच्या बाहेरील ग्रिलचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला नंतर गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलुप तोडले व मुर्तीच्या अंगावरील सोने चांदीचे दागीने, व इतर वस्तु चोरून नेले आहेत. विशेष म्हणजे येथे पाच रक्षक रात्रीच्या गस्तीस होते, त्यांनाही याची माहिती झाली नाही. शुक्रवारी सकाळी पुजारी मंदिरात जाताच त्यांना घटना निदर्शनास आली. हा प्रकार शुक्रवारी पहाटे झाला असुन पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी तपास चक्रे फिरवली आहेत.

हेही वाचा

नाशिकमध्ये डोळ्यांच्या साथीमुळे ३१ ऑगस्टपर्यंत उद्याने बंद

पुणे जिल्ह्यात 1 हजार 451 हेक्टरवर कापसाची लागवड

अहमदनगर शहरावर 200 कॅमेर्‍यांची नजर

Back to top button