स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्यावर देशविरोधी घोषणा देणार्‍यांना चोपले; दोघांना पोलिस कोठडी | पुढारी

स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्यावर देशविरोधी घोषणा देणार्‍यांना चोपले; दोघांना पोलिस कोठडी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यदिनी शहरातील भुईकोट किल्ल्यात देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या दोघांवर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याने न्यायालयातच हल्ला केला. देशविरोधी घोषणा देणार्‍या पाच जणांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलेे. यातील दोघांना पोलिस कोठडी मिळाली तर अन्य तिघे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, घोषणा देणार्‍या परवेज इजाज पटेल (रा.अमिना मशिदीजवळ, आलमगीर), अरबाज ऊर्फ बंबई शेख (रा. कोठला, अहमदनगर) या दोन आरोपींना न्यायालयाने 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून तीन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त भुईकोट किल्ला नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. पाच मुलांनी भुईकोट किल्ल्यातील एका कबरीजवळ जाऊन देशविरोधी घोषणा दिल्या.

ही बाब सैन्य दलातील हवालदार प्रशांतकुमार चंदेश्वरसिंग यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नायक पवनसिंग रघुवीरसिंग, दिलीप भीषण व भिंगार पोलिसांच्या मदतीने तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पसार झालेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, बुधवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता हिंदुत्ववादी संघटनेचे काम करणार्‍या अमोल हुंबे याने आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने न्यायालयात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ हुंबे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा

राज्यातील 142 नद्यांमधील गाळ काढण्याचे धोरण निश्चित

समतादूतांचा लाँग मार्च ; प्रलंबित मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर

संस्थास्तरावरील प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत !

Back to top button