कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंध ठेवणार्या इसमाने महिलेच्या चिमुरड्यास केलेल्या जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना कोल्हार- लोणी रोडवर खर्डे वस्ती येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मनीषा विठ्ठल माळी (रा. डिग्रस, ता. राहुरी) हिचे भाऊसाहेब बर्डे यांच्याशी 8 वर्षांपूर्वी लग्न झाले, परंतु पती- पत्नीचे जमत नसल्याने सततच्या वादामुळे मनीषा डिग्रस येथे आत्याकडे रहात होती.
या दरम्यान तिची अंकुश अनिल बर्डे (रा. हिवरे बाजार, ता. पारनेर, हल्ली डिग्रस) याच्याशी ओळख झाली. मनीषा दोन मुलांसह अंकुश बर्डेसोबत राहू लागली, परंतु अंकुश तिच्या दोन्ही मुलांना मारहाण करायचा, म्हणून मनीषा मुलांना बहिणीकडे सोडण्यास निघाली असता विशाल या 6 वर्षांच्या मुलाने मावशीकडे जायचे नाही, काकाकडे सोड, असा हट्ट करीत रडू लागला. त्याचा आग्रह व रडणे थांबत नव्हते. यामुळे अंकुश बर्डेने त्याला मारण्यास सुरुवात केली. विशालच्या जिव्हारी टोला बसल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर मनीषा व अंकुश यांच्यात वाद झाले. अंकुशने तिलाही मारहाण केली. तिने लोणी पोलिसात त्याच्याविरुद्ध खुनाची फिर्याद दिली.
हेही वाचा :