नगर : छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकासाठी भरीव निधी देणार : आ.राम शिंदे | पुढारी

नगर : छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकासाठी भरीव निधी देणार : आ.राम शिंदे

नगर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजी राजे, आमदार संग्राम जगताप यांनी निधी स्वरूपात योगदान दिले आहे. माझ्याकडूनही स्मारकामध्ये छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे शिल्प चरित्र व कमानीसाठी भरीव निधी देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली. शहरातील लाल टाकी रस्त्यावरील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदार निधीतून अत्याधुनिक अभ्यासिका बांधण्यात येत आहे. त्या इमारतीच्या कामाला शनिवारी आमदार शिंदे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, उद्योजक अमोल गाडे, पत्रकार विजयसिंह होलम, पत्रकार विठ्ठल लांडगे, संजय गाडे, डॉ. अमित पवार, डॉ. अविनाश मोरे, ज्ञानदेव पांडुळे, रामकृष्ण कर्डिले, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष संपूर्णाताई सावंत उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले, छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे स्मारक नगरकरांसाठी इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. आजही चांगल्या विचारांची देवाण-घेवाण स्मारकातून होते. स्मारकाच्या उभारणीसाठी मलाही योगदान देता आले याचा मनस्वी अभिमान वाटतो. येथे अत्याधुनिक अभ्यासिका उभी राहत आहे. हा विचारांचा कट्टा येणार्‍या अनेक पिढ्यासांठी दिशादर्शक राहणार आहे.

स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी प्रास्ताविक केले. शुभम पांडुळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूरज भोर, धीरज कुमटकर, विनीत गाडे, सागर घोरपडे, सलमान सय्यद, सुरेश भोर, मयूर ढगे यांनी परिश्रम घेतले होते.

हेही वाचा :

Google ने भारतीय अभिनेत्री श्रीदेवीचा वाढदिवस डूडलद्वारे केला साजरा

पंढरीत दोन लाखांवर भाविक

Back to top button