संतप्त नातेवाईकांनी पेटविले सासरचे घर

संतप्त नातेवाईकांनी पेटविले सासरचे घर

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे चिमुकल्यासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरचे घर पेटवून दिले. यावेळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मनीषा संदीप नरवडे (वय 35) यांनी मंगळवारी ओमकार संदीप नरवडे (वय 10) या चिमुकल्यासह शेततातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुसर्‍या दिवशी उघडकीस आली. ग्रामस्थांनी पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डीला पाठविण्यात आले. गुरूवारी मयत महिलेचे माहेर असलेल्या खुंटेफळ (ता. शेवगाव) येथील नातेवाईक तिसगावमध्ये आले. त्यांनी सासरच्या नरवडे कुटुंबाचे राहते घर पेटवून देत संताप व्यक्त केला.

नरवडे कुटुंबाचे घर पेटवून दिल्याची माहिती समजताच सरपंच इलियास शेख, बाळासाहेब लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर, काकासाहेब शिंदे, चेअरमन भारत गारूडकर, आनंद लवांडे, उदय लवांडे, सतीश साळवे, वैभव वाघ आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून पेटलेले घर दुपारी एक वाजता सुमारास विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी गोठ्यात बांधलेल्या गायी, म्हशी, बैल शेळ्यांना सुरक्षित स्थळी हलविले. मयत मनीषा नरवडे व ओमकार नरवडे यांचा अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता नरवडे यांच्या राहत्या घरासमोर करण्यात आला. सासर व माहेरची मंडळी समोरासमोर आल्याने तिसगावमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस घटनास्थळी हजर होते.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news