रायगड : वरसे ते अगरदंडा रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा | पुढारी

रायगड : वरसे ते अगरदंडा रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा

रोहे; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे ते मुरुड तालुक्यातील अगरदंडा हा नव्याने रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळावी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या दृष्टिकोनातून संपादित होत असलेल्या शेतकऱ्यांची स्थानिक प्रकल्पग्रस्त कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या स्थानिक प्रकल्पग्रस्त कृती समितीने रोह्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही कृती समिती स्थापन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रकल्पासाठी २३० मीटर जमीन घेणार आहेत. परंतु ५० मीटरचे मोबदला देणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या संस्थानिकाचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नासाठी स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. रेल्वे प्रकल्प होणार असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतील यासाठी सर्व्हिस रोड तयार करणे, फाटक न करता ओवर ब्रिज बांधणे, पशुधनाचे नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण भिंत बांधणे या सुविधा कडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

शेतकरी भूमिहीन होणार असल्यामुळे योग्य मोबदला मिळावी अशी आमची मागणी आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी राजेंद्र पोकळे, स्थानिक प्रकल्पग्रस्त कृती समितीचे कार्याध्यक्ष किरण मोरे, उपाध्यक्ष हरेश नायणेकर, खजिनदार अमित मोहिते, सहसरचिटणीस दामू घरटकर, सचिव उदय शेलार, रवी चाळके, नवनीत डोलकर, सहसचिव दत्ता चव्हाण, राकेश करंजे, संतोष पार्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button