माजी सैनिकाची दीड लाखाची रोकड लंपास ; भिंगार पोलिस ठाण्यात फिर्याद

file photo
file photo

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : माजी सैनिकाने शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम असलेली पिशवी दोघांनी लक्ष विचलीत करून पळविली आहे. ही घटना मंगळवारी (दि.8) दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँकेच्या गेट जवळ घडली.
याबाबत सुभाष पोपट गरड (रा.निंबोडी, ता.नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गरड भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी मंगळवारी (दि.8) नगरमध्ये येवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून कामानिमित्त दीड लाखाची रोकड काढली.

ती त्यांच्या जवळील पिशवीत ठेवली. बँकेतून बाहेर पडून ते गेट जवळ आले असता त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी गरड यांना बोलण्यात गुंतवले. तसेच, त्यांचे लक्ष विचलीत करून त्यातील एकाने हातचलाखी करत त्यांच्या जवळील रोकड असलेली पिशवी काढून घेत तेथून पोबारा केला. थोड्या वेळाने रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर गरड यांनी आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत दोन भामटे पसार झाले होते. त्यानंतर त्यांनी भिंगार कँप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news