जावयांना सामुदायिक धोंडे जेवण; माहिजळगावमध्ये अनोखा उपक्रम

जावयांना सामुदायिक धोंडे जेवण; माहिजळगावमध्ये अनोखा उपक्रम
Published on
Updated on

मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील ग्रामदैवत काळ भैरवनाथ देवस्थान व ग्रामस्थांनी गावातील सर्वधर्मीय जावई बापूंना अधिक मासातील धोंडे जेवण देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले. अधिक मासात जावयाला धोंडे जेवण देण्याची प्रथा आहे. मात्र, माहिजळगाव परिसरातील जावयांना एकत्र बोलावत त्यांना पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी,भजे, कुरडया, पापड,लिंबू असे पंचपक्वान्नाचे जेवण दिले.दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मासाला सर्वधर्मियांत महत्व आहे.

या महिन्यात दान, धर्म विशेष म्हणजे अन्नदान पवित्र मानलं जाते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आमटी, भाकरी, कांदा, लिंबू आणि लोणचे असा महाप्रसाद केला जातो. महाआरती झाल्यावर भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. गावकर्‍यांच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणार्‍याचा सन्मान करण्यात येतो. अधिक मासानिमित्त जावयाचा पाची पोषख व फेटे बांधून सन्मान करण्यात येणार होता. मात्र, गावात काही कुटुंबातील व्यक्ती मृत होण्याच्या दुःखद घटना घडल्याने सन्मानाऐवजी मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news