नगर : मुलीला पळवून नेणार्‍याला चोवीस तासांत पकडले | पुढारी

नगर : मुलीला पळवून नेणार्‍याला चोवीस तासांत पकडले

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत मुंबईतील वाशी येथून जेरबंद केले. तसेच, राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ करणार्‍या आरोपीला बीड येथून पथकाने अटक केली. एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने दोन्ही गुन्ह्यांचा 24 तासांत छडा लावून आरोपी पकडले. तौफिक मिटू पठाण (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) याने कोपरगावातील मुलीला पळविले होते. पठाण याला पोलिसांनी मुंबईतील वाशी येथून अटक केली आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलगी व आरोपीचा आधी पुणे, लोणावळा भागात शोध घेतला. परंतु, आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन वाशी येथे असल्याची माहिती मिळाल्याने वाशी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नीलेश बारसे यांच्या मदतीने आरोपीला अटक केली. पुढील तपास कोपरगाव पोलिस करीत आहेत. आरोपी शाहनवाज असिफ शेख (वय 21, रा. वांबोरी, ता. राहुरी) याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने बीड येथून अटक केली असून, राहुरी पोलिसांच्या हवाली केले.

या पथकाने बजावली कामगिरी
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार बबन मखरे, शरद बुधवंत, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, संदीप दरदंले, सचिन आडबल, फुरकान शेख, शिपाई बाळू खेडकर, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे यांनी आरोपींना अटक केली.

हेही वाचा :

या गावाची अजब प्रथा ! चक्क 600 जावयांनीच गावकऱ्यांना दिले धोंड्याचे जेवण

धक्कादायक ! पिताच उठला चिमुकल्यांच्या जीवावर ; रागाच्या भरात फेकले विहिरीत

Back to top button