

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेत गदारोळ झाल्यानंतर कामकाज आज (दि.७) दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. राज्यसभेत मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधी पक्षाचे खासदार करत होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, सरकार मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत.
मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यसभेत निदर्शने केली. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत पास झाल्यानंतर आज राज्यसभेत, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडले जाणार आहे. गृहमंत्री अमित शहा हे विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत. त्याचवेळी काँग्रेसने आपल्या राज्यसभा खासदारांना व्हीप जारी केला आहे. या व्हिपमध्ये राज्यसभेचे कामकाज तहकूब होईपर्यंत खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने एनडीए सरकारला राज्यसभेतही हे विधेयक सहज मंजूर होईल, अशी आशा आहे.
हेही वाचा :