आमदार राम शिंदेंना घरचा आहेर ! | पुढारी

आमदार राम शिंदेंना घरचा आहेर !

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत नगरपंचायतच्या भाजप नगरसेविका मोहिनी पिसाळ यांचे पती दत्तात्रय पिसाळ यांनी आमदार राम शिंदे हे भाजपच्या नगरसेवकांना निधी देत नसल्याची तक्रार थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी स्वतः व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टेटसवरही ही माहिती ठेवली होती. दत्तात्रय पिसाळ हे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना भेटायला गेले असता, त्यांची ही भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमदार राम शिंदे हे नगरपंचायतीला कुठलाही निधी मिळू देत नाहीत. मी एकटा भाजपचा नगरसेवक असूनही कुठलेही काम माझ्या प्रभागात झाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काही दिवसांपूर्वी मुंबईला पालकमंत्री विखे यांना भेटायला गेलो असता, त्यांनीही कसलाच प्रतिसाद दिला नाही. सध्या एमआयडीसीच्या मुद्यावरून कर्जत-जामखेडच्या राजकारणाची चर्चा होत असताना भाजपच्याच नगरसेवकांनी आमदार राम शिंदे यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

अमित शहा पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेची शक्यता

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स

 

Back to top button