कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स | पुढारी

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगरमध्ये नुकत्याच झालेल्या मोहरम मिरवणुकीत गुंडासोबत कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकार्‍याचा (पीएसआय) डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्वच समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिस दलात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, यापूर्वीही मोहरम मिरवणुकीत याच गुंडासोबत पोलिसाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. आता पुन्हा तोच कित्ता अधिकार्‍याने गिरवल्याने वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

नगरमध्ये 28 जुलै रोजी कत्तलची रात्री व 29 तारखेला विसर्जन मिरवणूक निघाली होती. याच काळात पीएसआयने गुंडासोबत डान्स केल्याची चर्चा आहे. मिरवणुकीत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या कमरेला पिस्तूल असून तो आरोपीसोबत डान्स करत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आरोपीसोबत गाण्याच्या तालावर या पीएसआयने वर्दीवरच ठेका धरल्याचे दिसत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीसोबत पोलिस अधिकार्‍याने मिरवणुकीत डान्स केल्याने अनेक तर्कविर्तक काढले जात आहे. दरम्यान, ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्याही निदर्शनास आली असून, संबंधित अधिकार्‍यावर कारवाई होते की समज दिली जाते,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आ. नितेश राणे यांचा प्रहार
कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या डान्सबाबत आ. नितेश राणे यांनी राहुरीतील मोर्चाप्रसंगी भाष्य केले. व्हायरल व्हिडीओचा दाखला देत काही पोलिस अधिकार्‍यांमुळे पोलिस दलाची बदनामी होत असल्याचे आ.राणे म्हणाले.

हेही वाचा :

China Earthquake : चीनचा शानडोंग प्रांत भूकंपाने हादरला; अनेक इमारती कोसळल्या, १० जण जखमी

पुणे : ट्रकला टेम्पोची धडक; चालकासह दोघांचा मृत्यू

Back to top button