झगडे फाटा- वडगावपान फाटा नॅशनल हायवेला वर्ग करावा : आ. आशुतोष काळे | पुढारी

झगडे फाटा- वडगावपान फाटा नॅशनल हायवेला वर्ग करावा : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा कोपरगाव मतदार संघातील झगडे फाटा ते वडगाव पान फाटा हा राज्यमार्ग 65 नॅशनल हायवेकडे वर्ग करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांचा विकास करून आ. काळे यांनी तालुक्यातून जात असलेला सावळीविहीर ते सेंधवा (म. प्र.) एन. एच. 752 जी हा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे या राष्ट्रीय राजमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या 11 कि. मी. रस्त्यांसाठी 191 कोटी निधी आणला आहे.

याच धर्तीवर झगडे फाटा ते वडगाव पान फाटा राज्यमार्ग 65 सुमारे 34.200 कि.मी. लांबीच्या रस्त्याचा विकास करण्यासाठी तो नॅशनल हायवेकडे वर्ग करावा, या मागणीचे निवेदन आ. काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांना दिले. आ. काळे यांनी निवेदनात म्हटले, झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्यावर दररोज अंदाजे 1 लाख 5 हजार मेट्रिक टनापर्यंत वाहतूक होते. 10 हजारपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची नेहमी दुरवस्था होते. पुणे- संगमनेर ते कोपरगाव- औरंगाबाद या शहरांना जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे. महत्वाच्या या महामार्गाचे नियमित काम होणे गरजेचे आहे. हा महामार्ग नॅशनल हायवेकडे वर्ग करणे गरजचे आहे.

मंत्री चव्हाण यांनी घेतली दखल..!
या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गांभिर्याने दखल घेवून तातडीने कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

भाजपकडून त्याच्या खासदारांसाठी व्हिप जारी

शिर्डीजवळ सेक्स रॅकेट; दोघांना अटक

Back to top button