नगर: हरिश्चंद्रगडावर दाट धुक्यात रस्ता भरकटल्याने थंडीने गारठून पर्यटकाचा मृत्यू

नगर: हरिश्चंद्रगडावर दाट धुक्यात रस्ता भरकटल्याने थंडीने गारठून पर्यटकाचा मृत्यू

अकोले, पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री पर्वत रांगेतील पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडावर मंगळवार १ ऑगस्ट रोजी सांयकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा दाट धुक्यात रस्ता भरकटल्याने थंडीने गारठून मृत्यू झाला. अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते (वय ३५ रा.जालना ह.मु. कोहगाव, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे.

अकोले तालुक्यातील मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हरिश्चंद्रगडाने हिरवा शालू पांघरला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हरिश्चंद्रगड परिसरात ट्रेकिंग आणि मनमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत. जालना जिल्ह्यातील अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्य आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सहा पर्यटकांनी मंगळवार १ ऑगस्ट रोजी रोजी सांयकाळच्या सुमारास तोंलारखिंडीतुन हरिश्चंद्र गडावर चढण्यासाठी सुरुवात केली होती. परंतु, दाट धुक्यात सहा पर्यटकांचा ग्रुप रस्ता चुकल्यामुळे वेगळ्या दिशेने हरिश्चंद्रगड परिसरात रात्रीच्या अंधारात भरकटला होता. रात्रीच्या अंधारात पावसामुळे भिजल्याने हे पर्यटक गारठले होते.

पावसाने गारठल्याने बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते (वय ३५) या पर्यटकांचा मुत्यु झाला. काही पर्यटकांनी स्थानिक व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, बुधवारी उशिराने संपर्क झाल्यावर गुरुवारी सकाळी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, ए.व्ही भोये, एन एन पिचड, जी.बि.पालवी, ए.यु.धोंगडे, काळु गांवडे, तुलशीराम भारमल आदि ग्रामस्थांच्यामदतीने अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते यांचा मुतदेह दाट धुक्यातून व भर पावसात हरिश्चंद्रगडावरुन पायथ्याशी पाचनई गावात आणण्यात आला. त्यानंतर वाहनातुन हा मुतदेह राजुर ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन दाखल करण्यात आला आहे. तसेच राजूर पोलिसांत आकस्मात मुत्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news