अवमानकारक व्यक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना अटक करावी | पुढारी

अवमानकारक व्यक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना अटक करावी

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमान कारक वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने काल भिडे विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आले. संगमनेर बसस्थानक येथे काँग्रेसच्या वतीने भिडे विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी दुर्गाताई तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, गजेंद्र अभंग, निखिल पापडेजा, दिलीप जोशी, जावेद शेख आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ओहोळ म्हणाले, राष्ट्र पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम संभाजी भिडे करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, महात्मा फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी देशद्रोहा सारखा मोठा गुन्हा केला आहे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, एका बाजूला मणिपुर जळत आहे, तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रातही शांतता भंग करण्यासाठी संभाजी भिडे यासारख्या व्यक्ती बेताल व अवमानकारक वक्तव्य करत आहेत. काही वाईट विचारसरणीचे लोक देश भावना निर्माण करत आहेत, अशांना तातडीने अटक झाली पाहिजे. यावेळी संतोष हासे, संपतराव डोंगरे, गणेश मादास, दत्तू कोकने, सुरेश झावरे, नवनाथ आंधळे, अनिकेत घुले, आदींसह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधीच्या विचारवरच देशाची वाटचाल

लोकशाहीला ताकद देणार्‍या पुरोगामी विचारांचे असणार्‍या गांधीजींनी सातत्याने देशाच्या एकात्मतेसाठी काम करून पुढील पिढ्यांना विचार दिले आहे त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असून काही विकृत प्रवृत्तीकडून होणार्‍या या अवमान कारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे,अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

हेही वाचा

ब्रेकिंग : विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड

अहमदनगर : प्लॉटच्या वादातून माजी सैनिकाचा खून

नाशिक : गोदेच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम

Back to top button