अहमदनगर : सेवानिवृत्त लष्करी जवानाचा खून?

अहमदनगर : सेवानिवृत्त लष्करी जवानाचा खून?

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोगलगाव शिवारात रविवारी (दि.29) एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. नगरमधील सेवा निवृत्त जवान विठ्ठल नारायण भोर (वय 46, रा.गणेश चौक, बोल्हेगावफाटा, अ.नगर) घरून बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दाखल झाली होती. लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याकामी भोर यांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून पाठविण्यात आले होते. मात्र, मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती.

लोणी-तळेगाव रस्त्यावरील गोरडे पेट्रोल पंपाच्या समोर एका झाडाखाली रविवारी (दि.30) दुपारी सव्वादीड वा. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असल्याची माहिती लोणी पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, डॉग स्कॉड, फिंगर प्रींट स्कॉड, फॉरेन्सीक टीमने घटनास्थळाला भेट देली. छातीवर धारदार हत्याराने भोकसून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मृतदेह गोगलगाव शिवारात आणून टाकल्याची शंका पोलिसांना आहे.

नगरमध्ये पुन्हा 'ताबेमारी'?

नगर शहरात मोकळ्या प्लॉटस्वर ताबेमारी करण्याचे प्रकार सुरू आहेत. ताबेमारीतूनच अंकुश चत्तर यांचा खून झाल्याचा आरोप काँग्रेसच्या किरण काळे यांनी केला आहे. सेवानिवृत्त जवान भोर यांना एक फोन कॉल आला. फोनवरील व्यक्तीने 'मी तुम्हाला दुसरा प्लॉट देतो', असे म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर भोर घरी परतले नाहीत. या फोन कॉल्स्च्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news