संगणक टायपिंग परीक्षेत ‘डमी उमेदवार’;नेवाशातील धक्कादायक प्रकार

संगणक टायपिंग परीक्षेत ‘डमी उमेदवार’;नेवाशातील धक्कादायक प्रकार

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगणक टायपिंग परीक्षेसाठी नेवासे शहरातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल केंद्रात आठ जण अनधिकृतपणे आढळून आले. तर, एक जण चक्क दुसर्‍या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेला आढळला. याप्रकरणी 9 जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या वतीने 12 जुलै ते 28 जुलैपर्यंत घेण्यात येणारी संगणक टायपिंग परीक्षा चालू होती. नेवासा खुर्द येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल केंद्रावर पहिले दोन पेपर संपले होते व मधली सुट्टी चालू होती. महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे आयुक्त नंदकुमार बेडसे यांनी या केंद्रावर भेट दिली. त्यावेळी त्यांना परीक्षा केंद्रावर काही डमी उमेदवार आढळले. तोवर परीक्षा सुरू झालेली नव्हती. तसेच, कॉम्युटर्स लॉग इन करण्याचे काम सुरू होते.

प्रकाश मंडलिक (क्लासिक कॉम्युटर्स टायपिंग, सोनई), शरद जाधव (महाराष्ट्र कॉम्युटर्स टायपिंग, सोनई), ऋषिकेश खेडकर (यश टायपिंग कॉम्युटर्स, माका), आशाबी शेख (श्रीनाथ कॉम्युटर्स टायपिंग, नेवासा फाटा), दत्ता हापसे (महाराष्ट्र कॉम्युटर्स टायपिंग, सोनई), रूपाली पंडुरे (श्रीनाथ कॉम्युटर्स टायपिंग, नेवासा फाटा), मारिया गायकवाड (त्रिमूर्ती कॉम्युटर्स टायपिंग, नेवासा), कल्पना मंडलिक (क्लासिक कॉम्युटर्स टायपिंग, सोनई) हे अनधिकृतपणे परीक्षा केंद्रात आढळले.

तर, रविराज बाळासाहेब भुसारी (रा. राहुरी रोड, प्रशांतनगर, सोनई, ता. नेवासा) हा महाराष्ट्र कॉम्युटर्स इन्सिट्यूटतर्फे ऋषिकेश दरेकर (ह.मु. सोनई, ता. नेवासा) याच्या जागेवर परीक्षेसाठी अनधिकृतपणे बसलेला आढळून आला. यासंदर्भात नेवासा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news