कोकण, घाटमाथ्यावर गुरुवारपर्यंत पाऊस | पुढारी

कोकण, घाटमाथ्यावर गुरुवारपर्यंत पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा देशभरातील सर्वच राज्यांत मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. येत्या बुधवारपयर्र्ंत अशीच स्थिती राहणार आहे. रविवारी बहुतांश भागांत सूर्यदर्शन झाले. दरम्यान, कोकण व घाटमाथ्यावर 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने कोकण व घाटमाथा वगळता उर्वरित भागातील पाऊस कमी झाला आहे.

आता फक्त अंदमान, अरुणाचल, मणिपूर, मिझोराम त्रिपुरा, आसाम, हिमाचल प्रदेश, झारखंड, कोकण व गोवा या भागातच मुसळधार पाऊस सुरू असून, 5 ऑगस्टपर्यंत तो सुरू राहील.

असे आहेत अलर्ट…
कोकण : मुसळधार (5 ऑगस्टपर्यंत) मध्य महाराष्ट्र : मध्यम (2 व 3 ऑगस्ट) विदर्भ : मध्यम (1 ते 3 ऑगस्ट).

हेही वाचा :

सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? : आदित्य ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार आठ वर्षांनी एकाच व्यासपीठावर

Back to top button