संगमनेरात महिलेने घेतला एकाच्या हाताला चावा | पुढारी

संगमनेरात महिलेने घेतला एकाच्या हाताला चावा

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मावशीला मारहाण का केली म्हणून दोघा महिलांनी इंदिरानगरमधील एका गृहस्थालाच चावा घेत दुसर्‍या महिलेने लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली तर चॉकलेटचा कागद फेकून मारल्याचा जाब विचारला म्हणून चार जणांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याच्या घटना घडल्या. नलिनी बाळासाहेब संबूस व नवीन नगर रस्त्यावरील अश्विनी अविनाश भंडारी या दोघा महिलांनी विनोद बाजीराव रासकर यांच्या घरी जावून तू आमच्या मावशीला मारहाण का केली?’असे विचारल्याने बाचाबाची झाली.

भंडारी यांनी शिवीगाळ करीत चावा घेत जखमी केले. संबूस यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत विनोद रासकर यांच्या फिर्यादीवरून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना महाविद्यालय सुटल्यानंतर प्रवेशदारात थांबलेल्या रवींद्र भूषण कोळी या विद्यार्थ्याला गोकुळ शिंदे या तरुणाने चॉकलेटचा कागद फेकून मारला. त्यावर हातातील लोखंडी कड्याने मारुन त्याला जखमी करत बेदम मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले.

हेही वाचा

पुणे : शिवाजीनगर , हडपसरची हवा सर्वाधिक प्रदूषित

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग, 80 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले

बोरजमध्ये आढळला 15 फूट अजगर

Back to top button