बोरजमध्ये आढळला 15 फूट अजगर | पुढारी

बोरजमध्ये आढळला 15 फूट अजगर

कार्ला : बोरज हद्दीतील वनक्षेत्रात सुमारे 15 फूट अजगर आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. पाण्याच्या प्रवाहात आराम करत बसलेल्या अजगरला पाहायला तरुणांनी गर्दी केली होती. पण अजगराच्या जिवास धोका पोहोचू नये, म्हणून त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात दिले सोडून
शनिवारी (दि. 29) बोरज गावाशेजारील एका गोठ्यापासून काही अंतरावर अजगर असल्याची माहिती रोहण तिकोणे यांनी शिवदुर्ग टीमला दिली. शिवदुर्ग व वन्यजीवरक्षक टीमचे अनिल आंद्रे, दक्ष काटकर, जिगर सोलंकी, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे, यश वाडेकर, तेजस केदारी, बबलू मुर्‍हे यांनी जाऊन पाहणी केली असता त्यांना अजगर पाण्याच्या प्रवाहात विश्रांती घेत असल्याचे दिसले. काही तरी खाल्ल्याने त्याला हालचालही करता येत नव्हती. पण त्याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अजगराला वनविभागाच्या मदतीने जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले.

हेही वाचा :

पचनशक्ती आणि आरोग्य

पुणे : शिवाजीनगर , हडपसरची हवा सर्वाधिक प्रदूषित

Back to top button