भंडारदरा धरणावर वॉटर म्युझियम उभारावे : आ. सत्यजित तांबे | पुढारी

भंडारदरा धरणावर वॉटर म्युझियम उभारावे : आ. सत्यजित तांबे

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते? याची कल्पना सुध्दा जिल्ह्यातील नागरीक करू शकत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसर हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांना देखील खुणावत असतो.
अकोले तालुक्यात असलेले जीवन वाहिनी भंडारदारा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे.

त्यनिमित्त या परिसरात भारतातील पहिले वॉटर म्युझियम उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. उपमुख्यंमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना ही संकल्पना खूप आवडली, त्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. यामुळे पर्यटकांना तसेच व्यवसायकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा

रुईछत्तीशी : संततधारेने पिकांना उभारी, आत उन्हाची गरज

संगमनेरात मोहरम मिरवणुकीला गालबोट

काष्टी : दूध दरवाढ उत्पादकांच्या मानगुटी

Back to top button