श्रीगोंदा येथील शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त | पुढारी

श्रीगोंदा येथील शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई संयुक्तपणे पार पाडली. या प्रकरणी दाेघांना ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये शेत जमीन गट नंबर ७००, ७०१ यामध्ये लिंबोणीच्या झाडाचे मध्ये गांजाची लागवड केली आहे, अशी माहिती शनिवारी ( दि.३०) उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली.

यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलिस पथकाने जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला. या ठिकाणी लिंबोंणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केली होती. सदर ठिकाणी छापा टाकून अरुण हरिभाऊ जगताप  व बाळू हरिभाऊ जगताप (दोघे रा. जगताप वस्ती ) यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईवेळी पोलिस पथकासमवेत कृषी अधिकारी उपस्थित होते.

सदर छाप्यात गांजाची लहान-मोठी हिरवेगार पाला असणारी झाडे ताब्यात घेण्यात आली. यामध्ये एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्‍याची माहिती पाेलिस सूत्रांनी सांगितले.

ही कारवाई कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके, अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे आदींनी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button