अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा गुंगारा, चाराटंचाई भासण्याची शक्यता | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा गुंगारा, चाराटंचाई भासण्याची शक्यता

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात सध्या सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे चारा टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातून चारा वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 30 लाख 41 हजार मेट्रीक टन चारा शिल्लक असून, अंदाजे साडेतीन महिने इतका पुरणार आहे. जिल्ह्यातील चार्‍याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करीत अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहे.

  • जिल्ह्याबाहेर नेण्यास केली मनाई
  • 30 लाख मे.टन चारा शिल्लक
  • साडेतीन महिनेच पुरण्याचा अंदाज

हेही वाचा

पुणे : ‘रिंगरोड’ भूसंपादनाला उच्च न्यायालयात आव्हान

पंतप्रधानांचा पुणे दौरा : टिळक पुरस्कार कार्यक्रम निमंत्रितांसाठीच !

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

Back to top button