शिर्डीत नाईट लँडिंग सेवेवरून आ. थोरातांनी धरले धारेवर! | पुढारी

शिर्डीत नाईट लँडिंग सेवेवरून आ. थोरातांनी धरले धारेवर!

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : साई भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असूनही शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिर्डी विमान तळ अनेक संकटांचा सामना करीत आहे. नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊन चार महिने उलटले तरीसुद्धा नाईट लँडिंग का सुरू झाले नाही, असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध शहरांमधून दररोज 14 विमाने येत होती, मात्र त्या सर्वच विमानांची व्हीजीबिलिटी कमी असल्यामुळे सकाळच्या सत्रात विमानांचे आगमन किंवा प्रस्थान होऊ शकत नव्हते. आघाडी सरकारच्या काळात राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी 150कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली होती, मात्र त्याचाही विनियोग आपण योग्यरीत्या करू शकत नाही, अशा परखड शब्दांमध्ये आ. थोरात यांनी सरकारला धारेवर धरले.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाईट लँडिंगची चाचणी होऊनसुद्धा अद्याप नाईट लँडिंग सुरू का झाले नाही, असा सवाल आ. थोरात यांनी उपस्थित केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले की, काही अटींमुळे अडचणी आल्या होत्या, मात्र हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी तातडीने बोलून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे सांगत टर्मिनल बिल्डिंगमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, हे मान्य करीत, सध्या आम्ही तेथे फॅब्रिकेटिंग एसी एरिया तयार केला आहे. त्यात वाढ करून विमान प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लवकरच समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार..!

शिर्डी विमान तळावरील प्रवाशांसाठी विमान तळाची टर्मिनल बिल्डिंग अपुरी पडते नवीन कामाला तातडीने गती द्यावी, फ्लाईटची संख्या रोडावलेली आहे. विमान तळ विकास कंपनीचे शिर्डी विमान तळाच्या सोयी- सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अशा एक ना अनेक समस्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधी मंडळात सरकारकडे मांडल्या. यावर लवकरच समस्या सोडविण्याचे सरकार प्रयत्न करील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा

‘शासन आपल्या दारी’ पुन्हा पुढे ढकलले ; कार्यक्रम चौथ्यांदा रद्द

मंचर : पेसा क्षेत्रातील जि. प.शाळांमध्ये शिक्षक नेमणार

Heavy Rainfall: मुंबईत पावसाचा जोर कायम !

Back to top button